दुचाकीवर मोबाईल वरील संभाषणास बंदी घाला
निपाणी (वार्ता) : दोन दिवसापासून प्रादेशिक वाहतूक खाते आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने दुचाकीस्वरांना हेल्मेट सक्ती केली आहे. ती योग्य आहे. पण शहरातील व्यक्ती किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकानात खरेदीसाठी बाजार पेठेत फिरत जात असेल तर हेल्मेट वापरणे गैरसोयीचे होते. त्यासाठी शहरा बाहेर ये-जा करणाऱ्या दुचाकी स्वारांना हेल्मेटसक्ती करावी अशा मागणीचे पत्रक माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकातील अधिक माहिती अशी, शहराबाहेर उत्तर दिशेला क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा चौक, पूर्वेला समाधी मठ, जनावरांचा बाजार, दक्षिणेला लकडी पुल तर पश्चिमेला बाळुमामा स्वागत कमान या हद्दीच्या पुढे मात्र हेल्मेट सक्ती केली पाहिजे.
दुचाकी चालविताना एका हातात मोबाईल एका हातात वाहन धरून चालविणारे दुचाकीस्वारावर मात्र पोलीस यंत्रणेने खाकी हिसका दाखविला पाहिजे. तरच शहरातील होणारे लहान मोठे अपघात थांबणार आहेत. तरी नागरिकांनीही पोलीस यंत्रणेला सहकार्य करून अपघात पासुन स्वतः वाचूया व इतरांनाही वाचवुया. पोलिसांनीही या बाबींची योग्य दखल घेऊन कार्यवाही करावी असेही पत्रकात म्हटले आहे.
—————————————————————-
अल्पवयीन मुलांचे लाड बंद करा
अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यास देत आहेत. त्यामुळे अनेक लहान मुले दिवसभर शाळा व इतर कारणाच्या निमित्ताने शहरात दुचाकी चालवीत आहेत. अशावेळी अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न असून अल्पवयीन मुलांचे दुचाकीचे लाड बंद करावे.
Belgaum Varta Belgaum Varta