जुन्या आठवणींना उजाळा ; ११० माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : येथील कुमार मंदिर, विद्यामंदिर शाळेतील १९८८ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल ३६ वर्षानंतर एकत्रित आले. यावेळी विविध ठिकाणाहून ११० माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थिती दाखवली होती. वृंदावन गार्डन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
प्रारंभी विद्यार्थिनींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. प्रसन्न दोशी प्रस्तावित केले.
त्यानंतर पुष्पष्टी करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांनी ओळख करून दिल्यानंतर दुपारी ‘होम मिनिस्टर’चा कार्यक्रम पार पडला. तसेच सेल्फी स्टॅन्ड, वर्गशिक्षक यांच्याबद्दल माहिती देण्यात आली. सांगली येथील श्रद्धा शहा यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
राहुल कोठारी, नाना जाधव, विजय जाधव, नाना खोडबोळे, दीपक इंगवले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनिता कोकरे, प्रमोद बुधाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रणव मानवी यांनी आभार मानले.