निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात मिनी गुरुकुल विभागातर्फे जागतिक बाल कामगार निषेध दिन कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी बालकामगार निषेध याविषयी प्रबोधन पर नाटिका सादर केली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते.
ए. ए. चौगुले यांनी प्रास्ताविकात बाल कामगार निषेध दिनाचा उद्देश स्पष्ट केला. एम बी खिरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरती डोंगरे, संचिता पाटील, प्रेरणा नेजे, भाग्यश्री निकाडे, मधुरा पाटील, रुची प्रताप यांनी ‘भूक’ ही नाटिका आणि सुहास चौगुले, अथर्व शित्रे, उत्कर्ष भोपळे, संस्कार कांबळे, सार्थक पाटील, सुदर्शन प्रताप यांनी ‘शिक्षण ध्येय’ ही बाल कामगार प्रतिबंध प्रबोधन करणारी नाटिका सादर केली. त्यामधून बालकामगार समस्या व उपाय, सामाजिक जबाबदारीबद्दल जनजागृती करण्यात आली. एस. एस. चौगुले यांनी, बालमजुरीला आळा घालण्यासाठी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना बालमजुरीच्या हानिकारक परिणामांची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी एम. बी. खिरुगडे, एस. एस. पाटील, ए. एस. वाळके, एस. के. मगदूम, विजय साळुंखे, सागर कुंभार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी सूत्रसंचालन केले. एम. एस. असोदे यांनी आभार मानले.