निपाणी (वार्ता) : शिक्षणासारख्या पवित्र असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात पैसे मिळविण्यासाठी पेपर फुटीचे प्रकार होत असलेले पुरावे उपलब्ध होत होत आहेत. ज्या परीक्षेत भ्रष्टाचाराद्वारे ७२० पैकी ७२० गुण ६३ विद्यार्थ्यांना मिळत असतील तर १० वी पासुन १२ वी या तीन वर्षे पासुन नीट परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यावर हा अन्याय आहे. जो ३० लाख रुपये देऊन नीट पास होऊन डाॅक्टर होणार तो रूग्ण सेवे पेक्षा ३० कोटी मिळविण्यासाठी रूग्णांची लुटमार करणारच.
आजच संदेश वहन करणे सोपे आहे. त्यामुळे पेपर फुटीचे प्रकार इतर राज्यांत ही झाले नसतील ते कशा वरून. ज्या विद्यार्थ्यानी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेला सामोरे गेले त्याचे वर अन्याय आहे. शिवाय परीक्षेला उशीर आल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे वेळ वाया गेला म्हणून जादा वेळ देऊन पेपर सोडवून घेणे ऐवजी जादा मार्क देणे हे कोणत्या नियमात बसते?.
तेव्हा या कलंकित झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट रद्द करून सर्व म्हणजे जवळपास २४ लाख विद्यार्थ्यांची फेर परीक्षा घेतली पाहिजे आणि यातुन दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. शिवाय फेर नीट परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. शिवाय उजळणी झाली तर भावी डाॅक्टराना फायदाच होईल, असे पत्रक माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे.