महेशानंद स्वामीजी ; महात्मा बसवेश्वरच्या शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : सर्व सामान्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी पतसंस्था आणि बँका उदयास आल्या. पण अनेक ठिकाणी योग्य कारभाराआभावी या संस्था डबघाईस आल्या. तर काही मंडळींनी प्रामाणिकपणे संस्था चालवल्याने संस्थेसह नागरिकांचे आर्थिक जीवनमान उंचावत आहे. ग्रामीण भागाच्या विकासात पतसंस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे मत हंचिनाळ येथील भक्ती योगाश्रमाचे मठाधिपती महेशानंद स्वामीजी यांनी व्यक्त केले. येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या गळतगा शाखा उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी, निस्वार्थी संचालक आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यामुळे पतसंस्थेची भरभराट होते. महात्मा बसवेश्वर संस्थेने उत्तम प्रकारे संस्था सुरू ठेवून सभासद, कर्जदार, ठेवीदारांचे हित जोपासले आहे. सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे सहजासहजी कर्जदारांना कर्ज मिळत आहे. त्यामुळे कर्जरांनी वेळेत परतफेड करणे गरजेचे असल्याचे सांगितले. संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनीही संस्थेच्या प्रगतीचा आलेख स्पष्ट केला.
यावेळी कार्यक्रमास उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, डॉ. एस. आर. पाटील, किशोर बाली, प्रताप पट्टणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, श्रीकांत परमणे, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, किशोर बाली, निंगाप्पा धनगर, दिनेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, ग्राम पंचायत अध्यक्ष अजित तशिलदार, शिवानंद खोत, गुंडू पाटील यांच्यासह नागरिक व कर्मचारी उपस्थित होते.