निपाणी (वार्ता) : श्रीराम सेना हिंदुस्थान प्रमुख कार्यकर्ते व धर्मवीर छत्रपती संभाजी राजे तरूण मंडळ यांच्यातर्फे धर्मवीर छत्रपती न्यु संभाजी नगर सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या परीसरात ४० रोपे लावण्यात आली. श्री राम सेना हिंदुस्थान चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष ॲड. निलेश हत्ती व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.
ॲड. निलेश हत्ती म्हणाले, दरवर्षी श्रीरामसेना हिंदुस्थान संघटनेतर्फे शहर आणि उपनगरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला जातो. केवळ रोपे लावून थांबता ती मोठी होईपर्यंत संघटना त्यांची निगा राखत आहे. यापूर्वी परीसरात लावलेली रोपे मोठी झाली आहेत. त्यामुळे यापुढे काळात सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
यावेळी संघटनेचे प्रमुख श्रेयश आंबले, दिपक खापे, सुनिल दळवी, सुरज चौगुले, सुहास चौगुले, बाबु लोहार, अदित्य केसरकर, अदित्य मगर, शंभुराज दळवी, मुख्याध्यापक सुगते, कृष्णा शितोळे, कैलास केसरकर, दिपक खापे, सिध्दार्थ लोकरे, अरूण सुतार, अभि बुडके, कार्तीक बुरूड, जॅकी चव्हाण, बसु साळवी, दिपक बोंगाळे, नियाज मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta