निपाणी (वार्ता) : बेंदूर सणानिमित्य उत्तम पाटील युवा शक्ती संघातर्फे येथील हालसिद्धनाथ मंदिरजवळ आयोजित जनरल घोडा गाडी शर्यतीमध्ये निपाणी येथील सदाशिव घाटगे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजाराचे बक्षीस मिळवले.
शर्यतीत निपाणीच्या जे. ए. पाटील आणि विकास कांबळे यांच्या गाड्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची ३ हजार, २ हजाराची बक्षिसे मिळवली.
नवतर जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये निपाणीतील विकास कांबळे, नांगनूरच्या फंटू ड्रायव्हर आणि बुधिहाळच्या शिवराज जाधव यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना ३ हजार, २ हजार आणि १ हजाराची बक्षिसे देण्यात आली.
शर्यतीचे उद्घाटन व बक्षीस वितरण नगरसेवक शौकत मणेर, दत्ता नाईक, माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवराज शिरगण्णावर, शिवा भोसले, आशिष खोडबोळे, बाबासाहेब खोत, मारुती माळी, जगदीश कांबळे, शिरीष कमते, इम्रान मकानदार, राज गोरवाडे, विनोद पोतदार, अरविंद माने, दादू भोसले, संजय नाईक, बाबुराव नाईक, बसवराज चंद्रकुडे, प्रभाकर केसरकर, सोमनाथ पाटील, संजय वालीकर यांच्यासह शर्यती शौकीन उपस्थित होते.