कार्याध्यक्षपदी बंडा पाटील ; निपाणीतील राजवाड्यात निवडी
निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यात श्रीमंत विजयराजे देसाई सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी तालुका म. ए. समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. भारत पाटील होते.
महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्षपदी अजित पाटील, उपाध्यक्षपदी आनंदा रणदिवे-सौंदलगा, कार्याध्यक्षपदी बंडा पाटील-मतीवडे, सरचिटणीसपदी हिंदुराव मोरे- मत्तीवडे, मीडिया प्रमुख व खजिनदारपदी नेताजी पाटील- कुर्ली यांची निवड करण्यात आली.
कार्य कार्यकारीणीमध्ये शिवाजी पाटील-कुर्ली, भाऊसाहेब पाटील- कोगनोळी, दीपक पाटील- कुर्ली, प्रमोद कदम -भिवशी, सुधीर पाटील -पडलीहाळ, बळीराम पाटील -कुर्ली, उदय शिंदे -निपाणी,
नंदकुमार कांबळे -निपाणी, विशाल पाटील -निपाणी, मंगेश माने -आप्पाचीवाडी यांचा समावेश आहे. मार्गदर्शकपदी के. डी. पाटील- कुर्ली यांची नियुक्ती करण्यात आली.
नेताजी पाटील यांनी, भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला व्यक्ती, भाषा, स्वातंत्र्य असा मूलभूत व कायदेशीर अधिकार दिला आहे. त्यानुसार प्रत्येक नागरिकाला त्याची भाषा बोलणे, शिक्षण घेणे, त्याच भाषेमधून सरकारी कार्यालयीन कागद पत्रे मिळावीत हा घटनेने दिलेला अधिकार आहे. यानुसार सीमाभागातील जनतेने आपल्या मुलांना मराठी मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी अधिक जोर द्यावा. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे तिचे जतन व अधिक वाढ होईल व सीमा लढ्याला बळकटी मिळेल असे आवाहन केले.