निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी बोरगाव येथे भेट देऊन रावसाहेब पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले.
आमदार बंटी पाटील यांनी, रावसाहेब पाटील हे अत्यंत संघर्षमय जीवन जगले. त्यातून आलेल्या अनुभवातून सहकार, सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात यश मिळवले. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे काम केले. त्यामुळेच रावसाहेब पाटील यांचे नाव कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात झाल्याचे सांगितले.
यावेळी युवा उद्योजक अभिनंदन पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील, मीनाक्षी पाटील, पृथ्वीराज पाटील, युवराज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta