निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे डॉ. श्रीपती रायमाने यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून (ता.३) चिखलव्हाळमध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिर काळात शाळा मैदानाचे सपाटीकरण व स्वच्छता, ग्रामीण शौचालय, बेरोजगारी आणि स्वयंसेवकांद्वारे साक्षरता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. गटारी, रस्ते स्वच्छता, कृषी पिकांबद्दल जागरूकता, पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्त भारताची जनजागृती होणार आहे.
एड्स, डेंग्यू, चिकुनगुनिया जनजागृती मोहीम व व्याख्यान होणार आहे. याशिवाय आरोग्य तपासणी शिबिर, दिपोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.
शिबिरास कुलपती प्रा. सी. एम. त्यागराज, राज्य एनएसएस अधिकारी प्रताप लिंगय्या, कुलपती राजश्री जैनापुरे, कुलपती रवींद्रनाथ एन कुलपती (मूल्यांकन) प्रा. एस. बी. आकाश, प्रा.कमलाक्षी तडसडा, संजीव तलवार, शंकर निंगनूर, प्रवीण बागेवाडी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.