सौंदलगा : परंपरेनुसार रविवार ७ रोजी रात्री ८ वाजता कुदळ मारण्याचा विधी पार पडल्यानंतर मोहरम सणास मोठ्या उत्साहास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शुक्रवार १२ रोजी रात्री ९ वाजता मोहरम सणानिमित्त पीरपंजे व ताबूत बसवणे, अभिषेक व नैवेद्य अर्पण करणे, असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. १४ जुलै दिवशी मोहरम सणाचा मुख्य दिवस असल्याने त्या दिवशी गावातून प्रमुख मार्गावरून पीरपंजेची हलगीच्या वाद्यात सवारी काढण्यात येणार असून त्यावेळी गाठीभेटी व प्रदक्षिणा असे कार्यक्रम होणार आहेत. १५ रोजी रात्री ९ वाजता गंधरात्र, ताबूत व नालसाब यांना गंध चढवणे व उदं घालणे, १६ रोजी कतलरात, जागरण सोहळा, पहाटे ३ वाजता अग्नीचा खेळ असे कार्यक्रम होणार आहेत. १७ रोजी संध्याकाळी ५ वाजता ताबूत विसर्जन करून मोहरम सणाची सांगता करण्यात येणार आहे.
मोहरम निमित्त प्रसादासाठी देणगी देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta