मान्यवरांच्या भावना ; निपाणी फाउंडेशनतर्फे आदरांजली
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकारत्न रावसाहेब दादा पाटील हे गांधीवादी विचारसरणीचे होते. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, बहुजन समाजातील सर्वसामान्य लोकांना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक कुटुंबाला उभे केले. सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, याचा पाठपुरावा त्यांनी आयुष्यभर केला. त्यांच्या निधनाने सीमाभागातील आधारस्तंभ हरपला असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. येथील निपाणी फाउंडेशनतर्फे आयोजित आदरांजली कार्यक्रमात अनेकांनी विविध प्रसंग सांगून दादांच्या कार्याला उजळा दिला.
रावसाहेब पाटील यांचे सर्व धर्मीयांबद्दल सलोख्याचे संबंध होते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना शासनाचा सहकार महर्षी हा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे घेऊन जाऊया,
अशी मते प्रा. डॉ. अच्युत माने, प्रा. एन आय खोत, प्रकाश शहा, जयराम मिरजकर, प्रशांत गुंडे, दीपक इंगवले, प्रसन्नकुमार गुजर, प्रा.आनंद संकपाळ, प्रा. सचिन खोत, विठ्ठल वाघमोडे, सुधाकर माने, अस्लम शिकलगार यांनी व्यक्त केली.
प्रा. अजित सगरे यांनी वाहिलेल्या श्रद्धांजली वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नविजन कांबळे यांनी केले.
यावेळी प्रा. नानासाहेब जामदार, तुकाराम कोळी, कबीर वराळे, अशोक तेली, आय्याज पठाण, साजिदा पठाण, महेंद्र सांगावकर, सुभाष जोंधळे, बाबासाहेब मगदूम, प्रमोद निर्मळे, सर्जेराव हेगडे, सिद्धार्थ कांबळे, अशोक खांडेकर, अजित पवार यांच्यासह
निपाणी फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.