धनाजी पाटील; चिखलव्हाळमध्ये शिबिराची सांगता
निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरांमुळे युवकांमध्ये कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची आवड निर्माण होते. समाजात वेगळ्या प्रकारची जनजागृतीही राष्ट्रीय सेवा योजना करत असते. याचा चिखलव्हाळ गावातील नागरिक आणि शिबिरार्थीनी लाभ झाला आहे, असे मत ग्रामपंचायत अध्यक्ष धनाजी पाटील यांनी व्यक्त केले. बेळगाव येथील राणी चन्नम्मा विश्वविद्यालय आणि केएलइ संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या समारोप समारंभात ते बोलत होते.
उपप्राचार्य डॉ. आर. जे. खराबे म्हणाले शिबिरार्थीनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यातून स्वतःचे जीवन घडवण्याचा मार्ग शोधला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सात दिवसांत ग्रामीण जीवनाचे ज्ञान प्राप्त करून घेतल्याचे सांगितले.
कार्यक्रमाधिकारी डॉ. श्रीपती रायमाने यांनी, गेल्या चार-पाच वर्षात एनएसएस घटकाकडून केलेल्या कार्याची दखल घेऊन राणी चन्नम्मा विद्यापीठाने सतत बेस्ट एनएसएस युनिट अवॉर्ड, एनएसएस ऑफिसर अवॉर्ड, बेस्ट एनएसएस अवॉर्ड अवॉर्ड प्राप्त झाल्याचे सांगितले.
शिबिर काळात वृक्षारोपण, मैदानाचे सपाटीकरण, आरोग्य विषयक जागृती, शैक्षणिक जागृती, स्वच्छता अभियान, मोफत आरोग्य तपासणी जनावरांचे शिबिर जनावर तपासणी, मंदिरांची स्वच्छता, डेंगू, एड्स, चिकनगुनिया याबद्दल जागृती रॅली, अंधश्रद्धेबद्दल वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमास महेश पाटील, सुशांत सटाले, संजय पाटील, संतोष साळुंके, रामचंद्र गडकरी, एस. एस कदम, श्री. एस. बी. चौगुला, रामचंद्र बन्ने, डॉ. अतुलकुमार कांबळे, एनएसएस अधिकारी प्रा. सुधीर कोठीवाले, यांच्यासह शिक्षक, नागरिक शिबिरार्थी उपस्थित होते.