उपप्राचार्य डॉ. आर. जे. खराबे : आजी, माजी सैनिकांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : स्वतःचे ध्येय निश्चित करुन ध्येयासाठी वेळ दिला पाहिजे. दररोज व्यायाम करून शरीर धष्टपुष्ट बनवले पाहिजे. देश सेवा ही श्रेष्ठ सेवा आहे. अशा शिबिरांच्यामुळे युवकांच्यात कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची आवड निर्माण होते आणि समाजात वेगळ्या प्रकारचे जनजागृतीही राष्ट्रीय सेवा योजना करत असते. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये माजी सैनिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे मत उपप्रचार आर. जे. खराबे यांनी व्यक्त केले. चिखलव्हाळ येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेला
आजी -माजी सैनिक क्षेम वृद्धीच्या सहभाग प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बाबासो साळुंखे, विजयकुमार इंगळे, विजय पाटील, किरण ऐवाळे, अमर शिंदे, बाबासाहेब चव्हाण, धोंडीराम शिंदे यांनी शिबिरार्थीना भगवतगिता देऊन सन्मानित केले. ग्रामपंचायत अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमधिकारी डॉ. श्रीपती रायमाने यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला.
महेश पाटील, सुशांत सटाले, संजय पाटील, संतोष साळुंखे, रामचंद्र गडकरी, एस एस कदम, एस. बी. चौगुला, रामचंद्र बनणे, डॉ. अतुलकुमार कांबळे, चैत्रा कोवलापुरे, साक्षी आणि निकिता यांनी मनोगत केले. प्रा. सुधीर कोठीवाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, नागरिक, शिबिरार्थी उपस्थित होते.