Tuesday , March 3 2026
Breaking News

सध्या शिक्षणाला अधिक महत्त्व द्या

Spread the love

 

क्षमा मेहता; ‘इनरव्हील’तर्फे आनंदी शाळेचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : सध्या जग बदलत चालले असून नवनवीन उपक्रम व संशोधन होत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण हे महत्त्वाचे साधन झाले आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत शिक्षणाला महत्त्व द्या, असे आवाहन इनरव्हील क्लबच्या चार्टर सदस्या क्षमा मेहता यांनी केले. इनरव्हील क्लबतर्फे अंमलझरी सरकारी शाळेत आयोजित ‘आनंदी शाळे’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. क्लबला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा उपक्रम राबविण्यात आला.
शाळेच्या आवारात रोपे लावून शाळेचे उद्घाटन झाले. मुख्याध्यापिका अमिराबी गद्याळ यांनी स्वागत केले.
मेहता म्हणाल्या, विद्यार्थ्यावर चांगले संस्कार होऊन सरकारी शाळेत आनंदी वातावरण निर्माण व्हावे. मुलांना नवनवीन शिक्षणाचे मार्गदर्शन धडे मिळून विद्यार्थी प्रोत्साहित होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे सांगितले.
क्लबच्या अध्यक्ष श्रेया खेडेकर यांनी बदलती शिक्षण पद्धती, मुलांना द्यावयाचे शिक्षण, असलेली गरज व आधुनिकता याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अर्चना बुर्जी, सीमा बागेवाडी, वर्षा नंदर्गी, श्रुती शहा, वैशाली पाटील, स्मिता शहा, श्रेयल शहा, सरोज मानवी, पायल शहा, वृषाली देशमाने, अश्विनी मैत्राणी, निर्मला चंद्रकुडे त्यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *