निपाणी (वार्ता) : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या भविष्यातील सर्व लढ्यांना निपाणी भाग मराठा समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला.
यावेळी मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बुंदी लाडूचे वाटप झाले. निपाणी भाग मराठा समाजाचे संघटक विनोद साळुंखे यांनी, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाजाने राहण्याचे आवाहन केले. यावेळी झुंजार दबडे, संजय तुपे, किशोर जाधव, शासन नियुक्त नगरसेवक ॲड. संजय चव्हाण, अनिल श्रीखंडे, दादासाहेब खोत यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta