यरनाळ ग्रामपंचायतचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून खासदारपदी निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून पालकमंत्री सतीश जारकीहोळी नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विकास गंगा आणू, अशी ग्वाही खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली. यरनाळ येथे बेळगाव जिल्हा पंचायत, पाणी तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आले आहे. या इमारतीसह भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्राचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी कांबळे होत्या.
खासदार जारकीहोळी म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाना लिहून सर्वांना समान अधिकार दिले आहेत. सर्व समाजासाठी अनेक पदे निर्माण केले आहेत त्या पदांचा सन्मान करणे आवश्यक आहे. नव्या विकास कामासह जुनी कामे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, डॉ. आंबेडकरांनी सविधान दिल्याने जगण्याला अर्थ प्राप्त झाला आहे. विरोधक शिष्टाचार न पाळता दम दाटीचे राजकारण करत असून तो कदापीत खपवून घेतला जाणार असल्याचे सांगितले.
माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी, काँग्रेसने दडपशाही मोडून काढली आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये येणार गावामध्ये सुवर्ण ग्राम योजना, रामलिंग रस्ता, बहुग्राम पाणी योजनेसह विविध विकास कामे राबविण्याचे सांगितले. सहकारात्न उत्तम पाटील यांनी, लोकोपयोगी कामांमध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. निवडणुकी पुरते राजकारण करून उर्वरित काळात विकास कामे करून मतदारसंघाचा कायापालट करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा. सुभाष जोशी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. संजय पाटील यांनी स्वागत तर संभाजी गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, अण्णासाहेब हावले, सुमित्रा उगळे, सुप्रिया पाटील, तालुका पंचायत अधिकारी डॉ. रवीकुमार हुकेरी, तहसीलदार प्रवीण कारंडे यांच्यासह नगरसेवक, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रमोद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.