
निपाणी (वार्ता) : जिल्ह्यातील काही विमा कंपनीनी जनतेचे पैसे भरून घेऊन त्यांची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे न्यायालयाने विमा कंपनीची मालमत्ता विकून लाभार्थींना त्यांचे पैसे परत द्यावे, यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयावर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून विमा कंपनीकडून तात्काळ पैसे वसुल करून देऊ. याशिवाय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले. लाभार्थ्यांना त्यांचे पैसे वेळेत परत न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू पोवार यांनी दिला.
यावेळी राघवेंद्र नाईक, शिवानंद मोगलीहाळ, महादेव होळकर, मनोहर गडकरी, अर्जुन रवळोजी, प्रेमा माळगी, सन्नाप्पा तुपकनवर, सुनंदा सिदनाळ, गौरम्मा काशमपुरी यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta