Tuesday , September 17 2024
Breaking News

निपाणीला नियोजनबद्ध पाणीपुरवठा होणार

Spread the love

 

खासदार प्रियांका जारकीहोळी; जवाहर तलावात गंगापूजन

निपाणी (वार्ता) : पडलेल्या दमदार पावसामुळे जवाहर तलाव भरून सांडव्यावरून वाहिला आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई भासणार नाही. याशिवाय वर्षभर नियोजनबद्ध पद्धतीने शहर आणि उपनाराला पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागांनेही यंत्रणा व्यवस्थितपणे हाताळणे आवश्यक असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. शनिवारी (ता.१७) दुपारी येथील जवाहर तलावात आयोजित गंगा पूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
खासदार जारकीहोळी म्हणाल्या, शहराला शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरवण्यासाठी नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभाग सज्ज आहे. नागरिकांनीही पाण्याचा दुरुपयोग करू नये. यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई असणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आपण पुढील २५ वर्षापर्यंतचा आढावा घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे सुपरवायझर प्रवीण कणगले यांनी स्वागत केले. उमेश यरनाळकर यांच्या पौरोहित्याखाली खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते गंगापूजन झाले. दीपक साठे दाम्पत्यांच्या हस्ते पूजा झाली. नगरपालिका आयुक्त दीपक हरदी यांनी, शहरा आणि उपनगरामध्ये एकही गळती राहिलेली नाही. त्यामुळे पाणी वाया जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शहरवासीयांना सुरळीत पाणी मिळेल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठ्याचे दिवस वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी आमदार काकासाहेब पाटील राजेंद्र वडर, नगरसेवक दत्ता नाईक, शौकत मनेर, ॲड. संजय चव्हाण, प्रवीण भाटले, सडोलकर, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, सुजय पाटील, दिलीप पठाडे, रवींद्र श्रीखंडे, अरुण आवळेकर, सचिन गारवे, युवराज पोळ, अनिता पठाडे, उपासना गारवे, लक्ष्मी बल्लारी, शांता सावंत यांच्यासह आजी माजी नगरसेवक व नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *