राजू पोवार : माणकापूर रयत संघटनेचे उद्घाटन
निपाणी : कर्नाटक राज्य रयत संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव पाठीशी आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यामध्ये संघटनेला यश आले आहे. कोगनोळी जवळील राष्ट्रीय महामार्ग परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित न करण्याबाबत संघटनेने नेहमी आग्रहाची भूमिका घेतली होती त्यालाही आता यश आले आहे. अनेक जळीत उस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळवून दिली आहे. यापुढील काळातही शेतकर्यानी एकजूट करून विविध कल्याणकारी योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले.
माणकापूर ग्रामस्थांच्या वतीने रयत संघटनेचे शाखा उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी पोवार बोलत होते.
प्रारंभी राजू पोवार व इतर पदाधिकाऱ्यांची माणकापूर सर्कलपासून मलकारसिध्द देवालयापर्यत हालगीच्या कडकडाटात पदयात्रा काढण्यात आली. त्यनंतर मलकारसिध्द देवालयाच्या प्रांगणात कर्नाटक राज्य रयत संघटनेचे शाखा उद्घाटन झाले.
यावेळी रयत संघटनेचे कारदगा जिल्हा पंचायत अध्यक्ष बबन जामदार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही समस्येसाठी हाकेला धावून येण्याची ग्वाही राजू पोवार यांनी दिली.
यावेळी बबन जामदार, रयत संघटनेचे ग्रामीण युवा अध्यक्ष बाळासाहेब हादिकर, धनंजय माळी (माणकापूर), निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, भोज येथील रमेश पाटील, लखनापूरच्या लक्ष्मी मगदूम, बुदिहाळ शाखा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जैनवाडी शाखा अध्यक्ष नामदेव साळुंखे, आडी शाखा सेक्रेटरी तानाजी पाटील, कुमार पाटील, बेनाडीचे मल्लू मिरजे, गजबरवाडी शाखा अध्यक्ष शिवगौडा निकम, शिवापूरवाडी शाखा अध्यक्ष संजय जोमा, निपाणी शाखा अध्यक्ष सुभाष नाईक, माणकापूर शाखा अध्यक्ष पवनकुमार माने, मिनाक्षी तावदारे(कुन्नूर), कोगनोळी शाखा अध्यक्ष अनंता पाटील यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.