निपाणी (वार्ता) : येथील कमलनगर (रामनगर) मधील रहिवासी व वाळकी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या शिक्षिका सरोजा कृष्णा खोत यांना तालुकास्तरीय उत्तम शिक्षिका पुरस्काराने देण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने चिक्कोडी येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी आणि तालुका शिक्षक संघाच्यावतर्फे शिक्षणाधिकारी बी. ए. मेक्कनमर्डी, आमदार गणेश हुक्केरी, आमदार प्रकाश हुक्केरी व मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार देऊन खोत यांना सन्मानित करण्यात आले. सरोजा खोत या वाळकी येथीलएकाच शाळेत सलग २८ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta