डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी; क्रीडा, सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : कुमार अवस्थेत प्रवेश केल्यानंतर मुलांमध्ये शारीरिक व मानसिक बदल झपाट्याने होत असतात. अशा वयात भिन्न लिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होणे सामान्य बाब आहे. पण विद्यार्थ्यांनी आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवून आपले पूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित करावे, असे आवाहन बेळगाव येथील शिवोहम अध्यात्मिक केंद्राच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्पुर्ती मास्तीहोळी यांनी केले.
बेळगांव केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी पदवीपूर्व महाविद्यालयात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील क्रीडा आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे उद्घाटन आणि पी. यु. सी. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षा संकल्प’ या प्रेरणादायी कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या त्या बोलत होत्या.
पंकज टाकळे यांनी स्वागत केले. आफ्रीन मणियार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
डॉ. मास्तीहोळी म्हणाल्या, शिक्षणासोबत क्रिडा आणि सांस्कृतिक क्षेत्रालाही प्राधान्य दिल्यास सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधता येईल. यशाला बांधून ठेवता येत नाही. यश अपयश हे चालूच असते. मात्र आपण नेहमी अथक परिश्रम करीत आपल्या कर्माशी बांधील राहण्याचे आवाहन केले.
के एल ई संस्थेचे कार्यकारी सदस्य प्रवीण बागेवाडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. मान्यवरांच्या हस्ते बारावी परीक्षेतील विशेष गुणी विद्यार्थी आणि सी. ए. परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या आश्विन पटेल या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्या एच. डी. चिकमठ यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास स्थानिक कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश बागेवाडी, सदस्य एम. आर. पाटील, उपप्राचार्य आर. जी. खराबे, वेदांत गळतगे, बी. एच. नाईक, शारीरिक प्रशिक्षक सिद्धू उदगट्टी यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
गीता कमते आणि प्रज्ञा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. राजश्री सिदलीहाळमठ यांनी आभार मानले.