चंदगड : केंचेवाडी हे चंदगड तालुक्यातील एक छोटसं खेडेगाव आहे. या गावातील काही तरूणांनी एकत्र येऊन समाज बांधिलकी जपण्यासाठी १९९७ साली श्री. सिद्धी विनायक गणेश मंडळ केंचेवाडी या मंडळाची स्थापना केली. या मंडळांचे हे २८वे वर्ष असून गावचे जागृत देवस्थान वडदेव येथे मंडळाच्यावतीने दरवर्षी मोठ्या थाटामाटात गणेश उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळे देणगीदार गणपती बाप्पाची मूर्ती देणगी स्वरूपात देत असतात. या वर्षी प्रा. राजश्री अर्जुन जाधव यांनी पंचमुखी शेषवर बसलेली भव्य दिव्य अशी गणपती बाप्पाची मूर्ती मंडळाला देणगी स्वरूपात दिली. याचे औचित्य साधून श्री. सिद्धी विनायक गणेश मंडळ केंचेवाडीयाच्यावतीने सौ. संगीता दिनकर भोंगाळे (माजी सरपंच) याच्या शुभ हस्ते प्रा. राजश्री अर्जुन जाधव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव, सिताराम भोंगाळे (माजी सरपंच), गौरी नंदराज नांदवडेकर, शांताराम मोरे (गुरूजी), रावजी निंबाळकर, शिवाजी निंबाळकर इत्यादी व्यक्तिचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. रामचंद्र बागडी (माजी सरपंच), भिवा जाधव, प्रमोद निंबाळकर, नंदराज नांदवडेकर, दत्तू यादव, दत्तात्रय मोरे, अमर मोरे, सुभाष सावंत, समीर मोरे, सुशांत मोरे इत्यादी गणेश मंडळाच्या कार्यकत्यांनी हिरहिरीने कार्यक्रम सोहळा संपन्न करण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच मंडळाने सत्यनारायण पूजेचे आयोजन करून महाप्रसादाचे वाटप केले. हे मंडळ दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य करत असते.