नामदेव चौगुले : लोकसहभागातून १०० रोपांची लागवड
निपाणी (वार्ता) : वाढणाऱ्या जागतिक तापमानात वृक्षारोपण हा एकच पर्याय आहे. प्रत्येक सण-समारंभ पर्यावरणपूरक करून ऑक्सिजन निर्मितीस चालना देऊया. विश्वकर्मा यांनी विश्वाची निर्मिती केली असून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण मुलाच्या हाताला काम आणि पुढच्या पिढीस मोफत प्राणवायू देण्याचे पवित्र कार्य करूया, असे मत पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी व्यक्त केले.
येथील लेटेक्स कॉलनी, आवटे प्लॉट येथे श्रीविश्वकर्मा उद्यान उद्घाटन सोहळा विश्वकर्मा दिनी पार पडला. पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचे हस्ते विश्वकर्मा उद्यान फलकास पुष्पहार घालून अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
नामदेव चौगुले अथक प्रयत्नातून दोन तीन महिन्यात उद्यानाची निर्मिती केली.
शुभारंभ प्रसंगी जन्मदिनी १५ एप्रिल रोजी या उद्यानात २५ वृक्षरोपे रोपे लावून करण्यात आला. मनिषा मेहता गोरेगाव (मुंबई)
यांच्या भगिनी कॅनडास्थित सपना तेंडोलकर यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण, सुधीरकुमार राऊत व सई राऊत पुणे, माजी मुख्याध्यापक प्रकाश कडगावकर व क्षमा कडगावकर यांच्या लग्नाचा वाढदिनी रोपे लावण्यात आली. रणजीत गोरे (इचलकरंजी) अपूर्वा चौगुले, फिरोज चाऊस, डॉ. प्रशांत अथणी, संजय साळुंखे यांच्याही वाढदिनी रोपांची लागवड झाली. डॉ. प्रशांत अथणी यांनी उन्हाळ्यात स्वखर्चाने झाडांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला.
लोकसहभागातून १०० रोपे लावून समाजाला एक नवा आदर्श दिला. रविप्रसाद आवटे यांचेही मनोगत झाले.
कार्यक्रमास प्रकाश सुतार, रामचंद्र सुतार, संजय सुतार, अरुण सुतार, अरुण देसूरकर, अमोल सुतार, अनिल सुतार, सुखदेव सुतार, जोतिबा सुतार, दत्तात्रय लोहार, बाळासाहेब सुतार, ओंकार प्रभाकर सुतार, सुतार, प्रथमेश सुतार, किरण सुतार, सुतार, रुपाली सुतार, सरिता सुतार, वासंती सुतार, श्रद्धा सुतार यांच्यासह विश्वकर्मा अभिवृद्धी संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष प्रकाश सुतार यांनी आभार मानले.