निपाणी (वार्ता) : येथील निपाणी इंडस्ट्रियल को-ऑप इस्टेटची ३७ वी वार्षिक सभा संस्थेच्या आवारात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जोरापुरे होते.
संस्थेचे संचालक सुधाकर थोरात यांनी, माजी मंत्री शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती सुरू आहे. यापूर्वी काळात त्यांनी संस्थेच्या शिर्डीच्या प्रश्न सोडवून सहकार्य करावे, असे आवाहन केले.
अहवाल वाचनात संस्थेचे सेक्रेटरी बाळकृष्ण मगदूम म्हणाले, संस्थेचे ७०२ सभासद, ३ लाख ५१ हजाराचे भाग भांडवल,६१ लाख, ६० हजारावर बँक शिल्लक व ठेवी असून ५ लाख ९९ हजाराचा नफा झाला आहे. याशिवाय सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
अध्यक्ष बाळासाहेब जोरापुरे यांनी, कारखानदारांची अडचण लक्षात घेऊन संस्थेस आणखी जमीन विकत घेऊन रोजगार देणे आवश्यक आहे. लवकरच संस्थेसाठी नवीन इमारत बांधण्याचा मानस व्यक्त केला. सभेस उपाध्यक्ष धोंडीराम कणसे, संचालक मलगोंडा पाटील, शशिकांत सासणे, जनार्दन भटले, गुरुनाथ पाटील, सुवर्णा सुरवसे, ऋतुजा शहा, गीतन शहा, आनंदा सुरवसे, सचिन जाधव, हालशुगरचे संचालक समित सासणे, प्रकाश शिंदे, रावसाहेब फरळे, किरण निकाडे सुहास गुग्गे, रमेश भिवसे, समीर कुलकर्णी, इलियास पटवेगार, माधव कुलकर्णी, निरंजन कमते, बाळासाहेब वैराट यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते. सुशांत भिसे यांनी आभार मानले.