Wednesday , March 4 2026
Breaking News

अरिहंत संस्थेच्या कुर्ली शाखेचा वर्धापन दिन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत को. ऑप क्रेडिट (मल्टिस्टेट) संस्थेच्या कुर्ली शाखेच्या वर्धापन दिन कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला.
यावेळी महालक्ष्मी व सरस्वती पूजा पार पडली. साहिल माळी व सौरभ तुकाराम कांबळे यांची सैन्यदलात निवड झाली आहे. बळगाव मधील राणी चन्नमा युनिव्हर्सिटी येथे राजश्री विठ्ठल दिवटे ही ९ व्या रँक मध्ये उत्तीर्ण झाली. वंदना मारुती चौगुले हिची योग व बुद्धिबळ विभागीय स्पर्धेत निवड, धनराज दिलीप पाटील १० वी याची जिल्हा स्तरीय कुस्ती गटात प्रथम क्रमांक व राज्य स्तरासाठी निवड झाली. प्रज्वल पाटील कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचामान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अरुण निकाडे, श्रीनिवास पाटील, के. डी. पाटील, विश्वनाथ उर्फ बंडा पाटील, संजय शिंत्रे (वकील), अमर बापू शिंत्रे, लक्ष्मण नेजे, मारुती गोपाळ पाटील, सागर विठ्ठल कमते, राहुल कोष्टी, अजय पाटील, शिवाजी चौगुले, सीताराम चौगुले, सुदीप वाळके, प्रदीप निकाडे, बिरू हेरवाडे, नानासो पाटील, शंकर शेंद्रे, राजेंद्र चौगुले, विश्वनाथ पाटील, राजाराम पाटील उपस्थित होते. निपाणी शाखा व्यवस्थापक राजेंद्र बन्ने यांनी स्वागत केले. संजय चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. शाखा व्यवस्थापक प्रमोद निगवे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *