उपाध्यक्ष सतीश पाटील; ‘अरिहंत’ मुख्य शाखेचा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : सीमाभागातील सहकार क्षेत्राला उर्जितवस्था देण्यासाठी तीन दशकापासून अरिहंत संस्थेने सहकार क्षेत्रात योगदान दिले आहे. सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने कर्नाटक, महाराष्ट्र राज्यात शाखा विस्तारित करून सर्वसामान्यांचे हित जोपासले आहे. नियोजनबद्ध कामकाजामुळे ठेवींचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले आहे, असे मत संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथील अरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेचा ३४ वा वर्धापन दिन झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे यांनी, मुख्य शाखेसह ५८ शाखांद्वारे ही संस्था कार्यरत आहे. १२०७ कोटी पेक्षा अधिक ठेवींचे उद्दिष्ट गाठले आहे. सहकारासह विविध क्षेत्रातही कार्य करीत सभासदांचा विकास साधल्याचे सांगितले.
कार्यक्रमास कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील, पृथ्वीराज पाटील, संचालक सुभाष शेट्टी, अभयकुमार करोले, भुजगौडा पाटील, राजेंद्र पाटील, राजू मगदूम, मनोजकुमार पाटील, शिवानंद राजमाने, बाबासाहेब अफराज, श्रीकांत वसवाडे, संदीप पाटील, बाबासो वठारे, जयपाल नागावे, प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापुरे सहाय्यक व्यवस्थापक अभिनंदन बेनाडे, भरत गुंडे, प्रकाश जंगटे उपस्थित होते. अभय खोत यांनी आभार मानले.