निपाणी (वार्ता) : कोपरगाव (शिर्डी) येथील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबी एसई साउथ झोन तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये येथील केएलइ सीबीएसई शाळेची विद्यार्थिनी आस्था चिंतन शहा हिने १४ वर्षाच्या आतील विभागात २२ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे तिची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १७ वर्षाच्या आतील विभागात ३८ किलो वजन गटात सोनल संतोष लिगाडे हिने कांस्यपदक पटकाविले.
सौम्या खोत, आराध्या होनवाडे, समर्थ पाटील, प्रेम पुजारी, विधान श्रीपन्नावर या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीपर्यंत लढत दिली.
९ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर पर्यंत झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आस्था शाह या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. स्पर्धेमध्ये साउथ झोन मधून एकूण ८०० मुला मुलींनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थिनीला महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे सेक्रेटरी नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तिला प्राचार्या आशा मार्टिन तायक्वांदो प्रशिक्षक बबन निर्मले, क्रीडा शिक्षक विलास जगजंपी यांचे मार्गदर्शन लाभले.