Monday , December 8 2025
Breaking News

दुर्गामाता दौडीमुळे निपाणी शिवमय

Spread the love

 

तिसऱ्या दिवशी अभूतपूर्व उत्साह ; शिवाजी महाराजांच्या वेषात स्वागत

निपाणी (वार्ता) : दौडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या, पुष्पष्टी, ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर, युवकांसह बालचमूंचा उत्साह अशा वातावरणात शुक्रवारी (ता.४) येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाची दुर्गामाता दौड काढण्यात आली. यावेळी युवकांसह युवतींनी भगवे फेटे परिधान केल्याने निपाणी शिवमय बनली होती.
प्रारंभी मध्यवर्ती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तिचे पूजन मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद व विशाल पारळे यांच्या हस्ते झाले. विक्रम जाधव यांच्या हस्ते शस्त्र पूजन झाल्यानंतर ध्येय मंत्राने दुर्गामाता दौडला सुरवात करण्यात आली. तेथून दुर्गामाता दौड श्रीमंत शुद्धोजी राजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्याकडे मार्गस्थ झाली. राजवाड्यातील आई तुळजा भवानीची आरती संजय तिप्पे यांच्या हस्ते करून दौड जुना मोटार स्टॅन्डमार्गे, हौसाबाई कॉलनी, साखरवाडी परिसराकडे मार्गस्थ झाली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता.
साखरवाडी मधील मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभूषात दौडीचे स्वागत केले. दुर्गामाता दौड अशोकनगरमार्गे सटवाई रोडकडे मार्गस्थ झाली. यावेळी सटवाई देवीची आरती करून दौड नरवीर तानाजी चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक कडे मार्गस्थ झाली. तिथे प्रेरणा मंत्राने दौडीची सांगता करण्यात आली. यावेळी सुजल अस्वले, उत्तम कामते, रोहित पाटील, संदीप माने, धीरज वाडकर, प्रथमेश तिप्पे, अक्षय खोत, सिद्धार्थ कदम,अनिकेत कागीणकर, संदेश हिरुकुडे यांच्यासह बालचमू ,तरुण, महिला आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
——————————————————————
दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळ तर्फे गेल्या तीन दिवसापासून नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गामाता दौड होत आहे. पहिल्या दिवसापासून दिवसेंदिवस दौडीमध्ये सहभाग घेणाऱ्या युवक, युवती व बालचमूंची संख्या वाढत आहे. त्यामुळे या दौडीला उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *