Tuesday , March 3 2026
Breaking News

हत्यारे विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Spread the love

 

इचलकरंजी : शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करीत तलवारीसह हत्यारे विक्री करणाऱ्या रोहितसिंग बबनसिंग टाक (वय 20) व ओमकारसिंग किरपानसिंग टाक (25 दोघे रा. निपाणी, जि. बेळगाव) या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून त्यांच्याकडून 8 तलवारी, 2 गुप्ती, लहान व मोठे 72 कोयते, 112 सुऱ्या, रामपुरी चाकू असा मोठा शस्त्रसाठा तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा 45 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याची माहिती पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे व पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
नवरात्रौत्सवाची धामधूम आणि विधानसभा निवडणूक तोंडावर असताना शस्त्रे सापडल्याने खळबळ उडाली आहे. कबनूर येथील चौकात दोघेजण हत्यारे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मोटरसायकलवरून शस्त्रे घेवून जाणाऱ्या रोहितसिंग टाक व ओमकारसिंग टाक या दोघांना ताब्यात घेण्यता आले. त्यांच्याकडील दुचाकीवर मोठ्या प्रमाणात हत्यारे मिळून आली. पथकाने दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता ही हत्यारे विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले. 4 हजारांच्या 8 तलवारी, 800 रुपयांच्या 2 गुप्ती, 9950 रुपयांचे 72 कोयते, 5600 रुपयांच्या 112 सुऱ्या, 25 रुपयांचा रामपुरी चाकू असा 45 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती

Spread the love  पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *