Wednesday , October 23 2024
Breaking News

बेडकिहाळ दसरा महोत्सवात श्रीनय बाडकरची हॅट्ट्रिक

Spread the love

 

निपाणी : बेडकिहाळ दसरा महोत्सवामध्ये स्वर्गीय श्री. अशोक टी. नारे एजुकेशन अँड सोशल वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या गटात चित्रकला स्पर्धा राबविल्या जातात. या स्पर्धेत निपाणीचा श्रीनय बाडकर २०२२ मध्ये प्रथम, २०२३ मध्ये प्रथम, आणि या वर्षी २०२४ मध्ये तृतीय क्रमांक घेऊन आपले स्थान विजेत्यांच्या रांगेत कायम ठेऊन हॅट्रिक केली आहे.

विशेष म्हणजे नारे फाऊंडेशनच्या मान्यवर श्री. पार्थ नारे, श्री. सचिन मालगत्ते आणि परीक्षकांनी श्रीनयच्या कलेचं विशेष असं कौतुक केलं आणि सर्व उपस्तिथ सहभागी स्पर्धकांना चित्रामधील बारकावे कश्या पद्धतीने असावेत, एकाद्या चित्रात काय अपेक्षित असं काम असावं याचं उत्तम उदाहरण म्हणून त्याच चित्र प्रदर्शित केलं.

११ वर्षाच्या श्रीनय याला लहानपणापासूनच कला आणि ज्ञान सादरीकरणाची आवड आहे. आतापर्यंत यामध्ये शालेय, आंतरशालेय, इतर स्पर्धा, निपाणी कला महोत्सव, निपाणी टॅलेंट, बेळगावी आर्ट फेस्टिवल, पुणेकला अविष्कार, आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, बेंगलोर येथील टेड-एक्स अश्या विविध व्यासपीठांवर रॅपिड आर्ट आणि ज्ञान याचं सादरीकरन करून, आतापर्यंत श्रीनयनी ५ अवॉर्ड्स, ८ मेडल्स आणि २८ प्रमाणपत्र मिळवली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

उरुसातील मानाच्या फकिरांची रवानगी

Spread the love  कमिटी पदाधिकारी, मानकऱ्यांची उपस्थिती; बिदागीचे वितरण निपाणी (वार्ता) : सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतीक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *