Sunday , December 7 2025
Breaking News

गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणारी १८ वासरे, ३४ रेडके पकडली

Spread the love

 

कागल पोलिसांची कारवाई; एक ताब्यात

निपाणी : कत्तलीसाठी चार दिवस व एक आठवडे वयाची १८ गायींची वासरे व त्याच वयाची म्हशींची ३४ रेडके बेकायदेशीररीत्या टेम्पो गोठ्यात ठेवली आहेत, अशी माहिती गोरक्षण सेवा समिती निपाणीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मिळाली. यावेळी सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने या वासरांची सुटका केली. यावेळी वासरांची तोंडे चिकटपट्टीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत मिळाली. ही सर्व जनावरे गोरक्षण सेवा समिती निपाणीच्या कार्यकर्त्यांनी कागल पोलिसांकडे स्वाधीन केली. याची किंमत साधारण २ लाख २८ हजार आहे.

याप्रकरणी मोहम्मद हसन शेख (वय ३९, रा. करनूर, ता. कागल) याला ताब्यात घेण्यात आले. याबाबतची फिर्याद गो-रक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली मोहम्मद शेख याने करनूर येथील जनावरांच्या गोठ्यात तसेच चार चाकी वाहनात (एम.एच. ०९. सी.यू ५६ ७६) १८ वासरे व ३४ रेडके मिळून आली. वासरांना तसेच रेडकांना चार चाकी वाहनाचा परमिट नसताना, मुक्या जनावरांची वैद्यकीय तपासणी न करता, काही वासरांच्या तोंडाला चिकटपट्टी बांधून कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी गाडीत व आपल्या गोठ्यात दाटीवाटीने बेकायदेशीररीत्या ठेवल्याचे आढळून आले.
ही कारवाई श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गर्शनाखाली झाली. यावेळी प्राणलिंग स्वामीजी यांनी सदरील वासरांना पुढील संगोपनासाठी भगवान महावीर गोपालन सामाजिक सेवा संस्था कराड संचलित ध्यान फाउंडेशन गोशाळा घोलपवाडी येथे या वसरांनाची प्राणलिंग स्वामीजी यांनी व्यवस्थ केली. यावेळी करनुर गावामध्ये तणावाचे वातावरण झाले होते. यावेळी समाधी मठाचे स्वामीजी यांनी आवाहन केले की, जनावरे सांभाळण्यासाठी काही अडचण असेल तर ती समाधी मठ गोशाळामध्ये आणून द्यावीत.

यावेळी गोरक्षण सेवा समिती निपाणी प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सांगितले की, गोमतेची बेकादेशीररीत्या वाहतूक किंवा कत्तल होत असेल तर जवळच्या पोलीस प्रशासनाशी किंवा गोरक्षण सेवा समिती निपाणीशी संपर्क करावा.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *