कोगनोळी : दि. 23 रोजी झालेल्या प्रभाग क्रमांक 7 मधील पोटनिवडणुकीत वीरकुमार पाटील ग्रामविकास आघाडीचे उमेदवार भिकाजी आवटे यांनी 312 मतांच्या आघाडीने विजय मिळवला आहे. विजय होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला. ग्रामदैवत श्री अंबिका मंदिराजवळ माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, अनिल चौगुले, युवराज कोळी यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भिकाजी आवटे यांचा सत्कार केला.
या पोट निवडणुकीमध्ये 681 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भिकाजी आवटे यांना 477 मते मिळाली. तर विरोधी गटाचे उमेदवार नितीन धनवडे यांना 165 मते मिळाली. तर 39 मते खराब झाली. भिकाजी आवटे यांनी 312 मताची आघाडी घेतली.
यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले, प्रभाग क्रमांक 7 मधील मतदारांनी आवटे यांना पसंती दिली. निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे. सर्वांनी परिश्रम घेतल्यानेच काँग्रेस गटाचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आला आहे.
याप्रसंगी बाळासाहेब कागले, केडी पाटील, दिलीप पाटील, युवराज कोळी, संजय पाटील, महेश जाधव, प्रवीण भोसले, दादासो मानगावे, पुनम डांगरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta