सौंदलगा : सौंदलगा येथील ऐतिहासिक बुरुजाची युवा वर्गाकडून स्वच्छता करून ऐतिहासिक बुरुजाची जतन करण्यासाठी युवावर्गात जागृती झाली आहे. या शेवटच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे काळाची गरज असून त्यासाठी सौंदलग्यातील युवकवर्ग पुढे सरसावला आहे. सौंदलगा गावात ऐतिहासिक असा भुईकोट किल्ला होता. मात्र काळाच्या ओघात त्याचे अवशेष संपले असून त्या भुईकोट किल्ल्याचा एक भाग म्हणजे शेवटचा बुरुज उभा आहे. हा बुरुज सुद्धा जीर्ण अवस्थेत असून त्याची पडझड ही झाली आहे. त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. असा विचार करून सौंदलगा येथील युवावर्गाने त्याची डागडुजी करण्याचे मनावर घेतले आहे. या ऐतिहासिक बुरजाला इतिहास असून भावी पिढीला इतिहास समजावा. या उद्देशातून या बुरुजाची सध्या स्वच्छता करण्यात आली असून या बुरुजा भोवती सपाटीकरण केले आहे. या बरोबरच नैसर्गिक आपत्तीतून काही ठिकाणी त्याची पडझड झाली असून त्याचीही दुरुस्ती करण्याचा विचार आहे. सौंदलग्याच्या इतिहासाचा एकमेव साक्षीदार म्हणून हा शेवटचा बुरूज आहे. या बुरुजामुळेच सौंदलग्याला दैदिप्यमान इतिहास होता. हे यातून सिद्ध होते. या इतिहासाचा विसर पडू नये यासाठी या बुरुजाचे जतन करणे गरजेचे आहे. यासाठी युवावर्गाने भाग घेतला असला तरी जनमानसात याची जागृती होणे ही गरजेचे आहे.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …