लक्ष्मणराव चिंगळे : मुख्यमंत्री परिहार निधी मंजूरी पत्राचे वाटप
निपाणी (वार्ता) : मुख्यमंत्री परिहार निधी योजनेतून आर्थिक सहकार्य मागणीसाठी २० जणांनी आपल्याकडे अर्ज केली होता. त्याप्रमाणे १३ जणांना पहिल्या टप्प्यात निधी मंजूर झाला आहे. हा निधी ३ लाखाहून अधिक आहे. इतर अर्ज प्रलंबित असून तेही लवकरच मंजूर होतील. शस्त्रक्रिया व आजारपणातील औषध उपचारासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. त्यापैकी निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यातील आणखी १३ रुग्णांना मुख्यमंत्री परिहार निधी मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे, अशी माहिती बुडाचे लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी (ता.४) लाभार्थ्यांना निधी मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सरोजिनी मगदूम-अकोळ, अनिल संत-निपाणी, शिवाजी खवरे-कोडणी, सुशीला रेंदाळे- जत्राट, स्वरूपा कोंडेकर-गळतगा, रवीकिरण हासुरे-निपाणी, रामा गाडीवड्डर-अक्कोळ, सचिन हिरवे-गळतगा, लक्ष्मी नारे-अकोळ, जयश्री बाडकर-केरूर, राजेंद्र पाटील-निपाणी या रुग्णांना मुख्यमंत्री परिहार निधी मंजूर झाला आहे. यापुढेही परिसरातील गोरगरीब रुग्णांनी मुख्यमंत्री परिहार निधीची आवश्यकता भासल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे सांगितले.
यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, निपाणी टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकु पाटील, युवा नेते सुजय पाटील, संजीव कांबळे, हाजी मुल्ला, नगरसेवक ॲड. एस.एस. चव्हाण, रवींद्र श्रीखंडे, संदीप चावरेकर, सुनील शेलार, दीपक सावंत, विनोद बल्लारी, महादेव कौलापुरे, जरारखान पठाण, भालचंद्र पारळे, बाळू कमते, सुशांत खराडे यांच्यासह कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta