निपाणी : निपाणी येथील बसस्थानकावर कर्नाटक, महाराष्ट्रसह कोकण भागातील प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे प्रवासावेळी गैरसोय होऊ नये, यासाठी केएसआरटीसीतर्फे बसस्थानकावर शौचालये बांधली आहेत. पण, त्यांच्या वापरासाठी प्रवाशांकडून लूट केली जात आहे. ही लूट तत्काळ थांबवावी, या मागणीचे निवेदन फोर-जेआर मानवाधिकार संघटनेतर्फे परिवहन मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनातील माहिती अशी, बसस्थानकावर बांधलेल्या शौचालय वापरासाठी वाजवी रक्कम शासनाकडून निर्धारित केली आहे. पुरुष व महिलांसाठी मोफत मुतारी व शौचालयासाठी १ रुपये दराचा फलक लावला आहे. मात्र, प्रवाशांकडून जास्त रक्कम आकारली जात असून, याकडे लक्ष द्यावे.