निपाणी : दरवर्षीप्रमाणे, या वर्षीही महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटकमधील हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महामेळावा आयोजित केला होता. मात्र, बेळगाव पोलिसांनी महामेळाव्याला परवानगी नाकारली होती. विनापरवाना सुरु होणाऱ्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरहून बेळगावला येणाऱ्या कोल्हापूरमधील शिवसैनिकांना निपाणी सीमेवरच पोलिसांनी रोखले.यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे आणि अन्य कार्यकर्त्यांना निप्पाणी सीमेत कर्नाटकमधील पोलिसांनी अडवले. यावेळी कर्नाटकमधील पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांची वादावादीही झाली.