निपाणी (वार्ता) : येथील कोल्हापूर वेसवर असलेल्या बागेवाडी कॉलेजसमोरील चर्चमध्ये बुधवारी (ता. २५) ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा पार पडला.
रेव्ह. सचिन ननावरे यांनी, येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानव जातीला शांतीचा संदेश दिला आहे. त्याचे जीवनात आचरण करावे. समाजातील रंजल्या, गांजल्यासह वंचितांना दानधर्म करावे. तरच ख्रिसमस साजरा केल्यासारखे होणार असल्याचे सांगितले.
यावेळी समाज बांधवांना एस. एस. सकट यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी सामूहिक प्रार्थना करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. त्यानंतर उपकार स्तुतीची प्रार्थना, स्तोत्र वाचन, शास्त्र वाचन, ख्रिस्त जन्माचे गीत, मध्यस्थीची प्रार्थना करण्यात आली. यावेळी दानार्पन, संदेश, सामूहिक गीत, प्रभूची प्रार्थना आणि आशीर्वचन झाले. नवीन वर्ष भक्ती कार्यक्रम पार पडला. यावेळी रमेश हेगडे, सनी हेगडे, रमेश सकट, दीपक सकट, अनिल हेगडे,योगेश आवळे, अविनाश हेगडे, किसन दावणे, मायकल आवळे, सचिन आवळे, मोशे सकट, अतुल सकट, समीर हेगडे, अनिल सोनुले, रेखा हेगडे, विमल आवळे, सुषमा आवळे, कमल हेगडे यांच्यासह महिला व ख्रिस्त समाजबांधव उपस्थित होते. सचिन हेगडे यांनी आभार मानले.