
संकेश्वर (प्रतिनिधी) : अखिल भारत वीरशैव महासभा हुक्केरी तालुका युवा घटक उपाध्यक्षपदी नगरसेवक अमृतराज उर्फ रोहन एस. नेसरी, कार्यदर्शी (सचिव) म्हणून युवानेते शंकर ऊर्फ बबलू एस. मुडशी यांची निवड करण्यात आली आहे. विजेयेंद्र येडियुरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगांव जिल्हा अध्यक्ष चेतन अंगडी यांनी अखिल भारत वीरशैव महासभेचा विस्तार आता तालुका पातळीवर केला आहे. आपल्या निवडीविषयी सांगताना अखिल भारत वीरशैव महासभा हुक्केरी तालुका युवा घटकचे उपाध्यक्ष रोहन नेसरी म्हणाले, आमचे लाडके नेते राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती, अखिल भारत वीरशैव महासभा जिल्हा अध्यक्ष चेतन अंगडी यांनी आपली तालुका उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
वीरशैव महासभेचे कार्य तालुका पातळीवर चालावे. याकरिता प्रयत्न केले जात आहेत. वीरशैव समाजाचा सर्वांगीण विकास आणि समाज संघटीत करण्याचे कार्य केले जाणार आहे. आपली उपाध्यक्षपदी निवड करुन समाजसेवा करण्याची संधी मिळवून देणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे.
Belgaum Varta Belgaum Varta