निपाणी (वार्ता) : हुसदुर्ग येथे खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये फाईट, पुमसे व स्पीड पंच असे तीन विभाग होते. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी विविध प्रकारात यश मिळवले.
स्पर्धेत विश्वजीत पटनशेट्टी, तिलक कोठडीया, समर्थ निर्मले, अर्णव बोरगावे, समर्थ पाटील, अभिषेक उपाळे, तरुण घांची, महावीर घाची, अवनी व्हदडी, सौम्या खोत, लावण्या सावंत, पूर्वा साळुंखे, सानिध्य भिवसे, तन्वी धनानंद, यांनी सहभाग घेऊन अकॅडमीला 18 सुवर्ण, 14 रौप्य तर 9 कास्य पदक मिळवून दिले. बेळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीला मिळवून देण्यात यशस्वी ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .या स्पर्धेमध्ये कर्नाटक राज्यातून 450 हून अधिक मुला- मुलींनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांना सद्गुरु तायक्वांदो प्रशिक्षक बबन निर्मले तर सहप्रशिक्षक प्रथमेश भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta