निपाणी (वार्ता) : येथील मास्क ग्रुप संचलित डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघाचा सेवार्थ दवाखाना आणि प्रेमा शंकर जडी यांचे स्मरणार्थ विश्वस्थ श बसवराज जडी यांच्या नेतृत्त्वाखाली अंमलझरी येथे ‘डॉ. आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार फिरता दवाखाना मोफत रुग्णसेवा शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ९७ रुग्णांची मोफत आरोग्य व दंत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
सचिन कौंदाडे यांनी प्रास्ताविक केले. निस्वार्थी सेवेबद्दल ग्रामस्थां तर्फे महावीर आरोग्य सेवा संघाचे उपाध्यक्ष सतीश वखारिया यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महादेव सेवा संघाचे संचालक व ग्रामस्थां तर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले..
शिबिरास सेक्रेटरी मिलींद मेहता, संचालक रितेश शहा, सुजीत स्वामी, राजू मेहता, सागर शहा, सतीश श्रीप्पण्णावर, सुशांत खेडेकर, मेडिकल ऑफिसर डॉ. सुरज मोरबाळे, डॉ.ओंकार जाधव, ग्राम पंचायत सदस्य अभिजित कौंदाडे, सिद्राम पुजारी, सचिन कौंदाडे, वसंत रेपे, कृष्णात वाडकर, महेश खोत रामा रेपे, राजेंद्र कौदाडे, प्रथमेश कदम निखिल रेपे, अमेय कोकरे, सुरेश इंगळे, सुरज पाटील, विलास इंगळे, आशिष खोत, चंद्रकांत खोत यांच्यासह ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta