निपाणी (वार्ता) : येथील संभाजीरातील मराठी मुलांच्या शाळेत सावित्री फुले जयंतीनिमित्त वीरभद्र ऑरगॅनिक अँड सॅंडलवुड अग्रिकल्चर सोसायटी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी. एम. सुगते होते. प्रारंभी एचडीएमसी उपाध्यक्षा वंदना वंजारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर ए. एस. तावदारे, के.डी. खाडे, प्रवीण कोळी, महेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
आठवी ते दहावी गटामध्ये मयुरी भोसले- एमडी विद्यालय- अर्जुन नगर, श्रुतिका रावण-एसबीएस कन्या शाळा-निपाणी, तनुजा खवरे -एमडी विद्यालय-अर्जुन नगर यांनी प्रथम के तृतीय क्रमांक पटकावला. तर मयूर भोसले- एमडी विद्यालय-अर्जुन नगर यांने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले.
पाचवी ते सातवी गटात श्रीनय बाडकर केएलइ सीबी केएलइ सीबीएससी-निपाणी सावरिया कुंभार एमएचएस-आडी, देवराज पाटील एमडी विद्यालय-अर्जुन नगर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अक्षरा गुंडाळे एमडी विद्यालय-अर्जुन नगर, विवेक लोहार मराठी शाळा- संभाजीनगर निपाणी यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली. बाल गटामध्ये मयान भोंगाळे- अंकुरम विद्यालय, शुभ्रा नाईक गर्ल्स कॉन्व्हेंट स्कूल- निपाणी, धनश्री खांडेकर एमएचपीएस-आडी यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविला. ईश्वरी डोंगरे श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यालय- कागल, श्रीनिका बोरगले केएलइसीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल- निपाणी यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकाविली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धाकाला प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेसाठी कागल व निपाणी तालुक्यातील २५ शाळेतील ३७८ मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजीव माळी, प्राचार्य डॉ. जी. डी. इंगळे देवचंद उदय नाईक, प्रा. डॉ. आनंदी कांबळे, प्रा. डॉ. सुजाता पाटील यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सी. एम. सुगते, एम. ए. पाटील, एस. ए तावदारे, के. डी. खाडे, कृष्णा शितोळे, एस. व्ही. नगरे, सारिका मातीवड्डर, उज्वला तोडकर, सुनिता पवार, शारदा मातीवड्डर यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. आर. पी. पवार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta