निपाणी : केंद्र शासनातर्फे उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना सबसिडीच्या दरात स्वयंपाक गॅस सिलिंडर दिले जाते. इतर नागरिकांना ही सवलत दिली जात नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना आर्थिक फटका बसत आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी उज्ज्वला योजनेप्रमाणे सबसिडीच्या दरात स्वयंपाक गॅस सिलिंडर देण्याच्या मागणीचे निवेदन येथील ४-जेआर ह्यूमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनतर्फे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पाठविले.
निवेदनातील माहिती अशी, सर्वसामान्यांना उज्ज्वला योजनेप्रमाणे स्वयंपाक गॅस सिलिंडर देण्याच्या मागणीचे निवेदन यापूर्वी दिले होते. केंद्रीय मंत्र्यांनी धुरमुक्त समाजासाठी स्वस्त धान्य दुकानातून दिले जाणारे रॉकेल बंद केले आहे. नाईलाजास्तव गॅस सिलिंडर खरेदी केले आहे. अनेक कुटुंबीयांना उज्वलातर्फे दिलेल्या सिलिंडरला सबसिडी दिली जाते. स्वतः खरेदी केलेल्या सिलिंडर जोडणीला सबसिडी का नाही? दोन्ही प्रकारचे सिलिंडर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मिळतात मग दरातील भेदभाव करू नये, असेही म्हटले आहे. निवेदनावर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष राहुल ताडे, महिला अध्यक्षा विद्याश्री फुटाणे, संचालक सचिन पवार, अशोक खांडेकर, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रणोती फुटाणे यांच्या सह्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta