Saturday , March 7 2026
Breaking News

शेतात पडलेली अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी तब्बल 38 वर्षानी मिळाली…

Spread the love

 

निपाणी : 1987 साली यरनाळ येथील शेतात ऊस लागण करताना पडलेली माझ्या बाबांच्या (कै. शशिकांत रामचंद्र नेसरीकर रा. निपाणी) बोटातील सोन्याची अंगठी तब्बल 38 वर्षानी म्हणजे 4 जानेवारी 2025 ला त्याच रानात उसाची लागण करताना माझ्याच (चैतन्य शशिकांत नेसरीकर रा. निपाणी) पायातील चप्प्लेत रुतून/अडकून मिळाली.
इतक्या वर्षाच्या शेताच्या मशागतीमुळे अंगठीतील खडा गायब असून अंगठी सुस्थितीत आहे.
विशेष म्हणजे माझे बाबा कामगारांबरोबर ऊस लागण करताना उसाच्या टिपऱ्या मातीत दाबताना अंगठी गहाळ झाली होती, काम संपल्या वर हातपाय धुताना अंगठी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले पण त्या रानात नक्की कधी व कुठे पडली याची खात्री नसल्याने नशिबाला दोष देऊन तें शेतातून घरी आले. पण त्या रानात तें ज्या ज्या वेळी जायचे त्या वेळी तिथं काम करणाऱ्या कामगारांना, रयताना “माझी अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी इथं पडले, मिळाली तर द्या हं” असं चेष्टेत म्हणायचे. मलाही त्यांनी हे सांगितलं होतं.
माझ्या बाबांना 2004 साली देवाज्ञा झाली. कष्टाची कमाई वाया जात नाही म्हणतात याचा परत एकदा प्रत्यय आला. देवावरील आणि दैवावरील विश्वासही दृढ झाला. एखाद्या रानात 37-38 वर्ष इतके वातावरणाचे आघात सोसत, शेतातील मशागत, उंदीराची बिळे व कामगारांची नजर चुकवत माझ्या बाबांची अनामत माझ्या चप्पलला रुतून मलाच मिळाली हे बघून मन सुन्न, स्तब्ध व गहिवरून आले.

About Belgaum Varta

Check Also

आला उन्हाळा, वाहनांना सांभाळा!

Spread the love  वाढत्या तापमानामुळे आग; स्वतःसह वाहनांची घ्या काळजी निपाणी (वार्ता) : यंदा फेब्रुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *