निपाणी (वार्ता) : मानकापूरातील हुडा चौक महादेव मंदिर जवळ शेतकरी जनजागृती मेळावा पार पडला. त्यामध्ये अडीच वर्षांपूर्वी जळालेल्या पंचवीस एकरातील उसाचे नुकसान भरपाई हेस्कॉमकडून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी सत्याप्पा माळी होते.
एकरामध्ये १०० टन ऊस उत्पादन घेतलेल्या अभय वालीशेट्टी यांचा राजू पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजू पोवार यांनी, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळी परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागृत राहून लढा देण्याचे आवाहन केले. धनंजय माळी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी अधिकारी विजय माळी यांनी शेती विषयक विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिली. ग्रामपंचायत सदस्य ॲड. संदीप बन्ने यांनी मनोगत व्यक्त केले.
मेळाव्यास संघटनेचे तालुका सेक्रेटरी कल्लाप्पा कोटगे, बबन जामदार,रमेश पाटील, एकनाथ सादळकर, पवनकुमार माने, संतोष जिरगे ढाले, दादासो वरुटे, बाळासाहेब पुजारी, ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगुले, अरुण जाधव, राजू घाटगे, प्रमोद आरगे, दादासाहेब हिरेकुडे, शिवाजी चौगुले, तानाजी चौगुले, रामचंद्र तळवार, लक्ष्मण तळवार, अण्णासाहेब बत्ते, बोरगाव हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर पिराई, राहुल कांबळे यांच्यासह शेतकरी व रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta