निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; केली चमकदार कामगिरी
निपाणी (वार्ता) : श्रीलंका येथे झालेल्या पी. डी. चॅम्पियन्स (दिव्यांग) ट्रॉफीमध्ये निपाणीचा क्रिकेटपटू नरेंद्र उर्फ बबलु मांगोरे यांनी भारतीय संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. त्यामुळे भारताच्या संघाला विजेतेपद मिळाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल निपाणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहरापासून देशाचा झाला आहे.
प्रतिकूल परिस्थितीतून नरेंद्र यांनी क्रिकेट कारकिर्दीला सुर्वात केली. निपाणीतील टॉप स्टार क्रिकेट क्लबचा तो खेळाडू आहे. लहानपणासूनच त्यांना क्रिकेटची आवड आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर निपाणी, बेळगाव जिल्हा, कोकण, कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी झालेल्या मोठ मोठ्या क्रिकेट स्पर्धेत आपली चमक दाखवून अनेक ठिकाणच्या स्पर्धेतील बक्षिसे, चषकावर आपल्या ठसा उमटवला. शिवाय त्यांचे वडिल, कुटुंब, मित्र परिवारांनी त्याच्या पाठीशी उभ राहून त्याला भक्कम साथ दिली. खेळाडूंचे आयुष्य हे खडतर असते, पण तरीदेखील नरेंद्र यांनी सर्व परिस्थितीवर मात करून स्वतःच्या कष्टावर भारतीय दिव्यांग संघात स्थान पटकावून, संघात आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आपले स्थान भक्कम केले.
यापूर्वी भारतीय दिव्यांग सांघाकडून अफगाणिस्थान, इंग्लंड येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत व दिव्यांग विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातून खेळून दोन्ही स्पर्धेत यश संपादन करून आपल्या देशाचे व निपाणी भागाचे नाव उज्वल केले आहे. अशा युवा खेळाडूच्या योगदानाची दखल देश व राज्य शासनाने घेऊन त्याला शासकीय नोकरीत रुजू करून घेण्याची मागणी निपाणी व परिसरातील क्रिकेटप्रेमीतून होत आहे.
——————————————————————
आपला नसून देशाचा विजय
श्रीलंका येथून बबलू मांगोरे हे परत आले आहेत. त्यांची भेट घेतली असता हा आपला विजय नसून देशाचा आहे. निपाणीच्या मातीने मला घडविले असून मित्रपरिवार आणि कुटुंबाची साथ असल्याने आपण विश्वचषकाला गवसणी घालू शकल्याचे मांगोरे यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta