Friday , June 5 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनच्या प्रसाद मोळेराखीची रोटरी बेस्ट स्टुडंट म्हणून निवड

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊन यांच्यातर्फे बेळगाव जिल्ह्यातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी बेस्ट स्टुडंट स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये मराठी, कन्नड व इंग्रजी या तिन्ही माध्यमाच्या 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यासर्व विद्यार्थ्यांमधून मराठी विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थी प्रसाद बसवंत मोळेराखी याचा प्रथम क्रमांक आला आहे. ही निवड करताना सामान्य ज्ञान परीक्षा, निबंध लेखन, गटचर्चा, मुलाखत त्याचबरोबर शालेय, आंतरशालेय, राज्यस्तरीय स्पर्धा मधील सहभाग या सर्व गोष्टी तपासण्यात आल्या. या सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण करून प्रसादने या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला.त्याबद्दल त्याला गोल्ड मेडल, फिरता चषक व पाच हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. तसेच शाळेचा दुसरा विद्यार्थी यश गुगरट्टी याने ही उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. या यशाबद्दल शाळा प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, गजानन सावंत व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

पंचकन्यांमध्ये अहल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. शेवडे

Spread the love  बेळगाव : गौतमांच्या वेषात देवराज इंद्र आला आहे हे जाणूनही अहल्या इंद्राच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *