निपाणी (वार्ता) : येथील कोठीवाले कॉर्नर वरील डॉ. वैशाली आणि विलास पारेख महावीर आरोग्य संघ सेवार्थ दवाखान्याचे विश्वस्त राजेंद्र मेहता यांची कन्या ऋतिकाबेन मेहतायांनी जैन धर्माची दीक्षा घेतली. त्यानिमित्त येथील मास्क ग्रुपतर्फे त्यांचा आनंद उत्सव आणि स्वागत कार्यक्रम पार पडला. यापुढील मुख्य कार्यक्रम रविवारी (२५ मे) दीक्षाविधी गुजरातमधील संखेश्वरपुरम तीर्थ येथे होणार आहे.
ऋतिकाबेन यांचे गुरुवारी (ता.३०) सकाळी आठ वाजता येथील रोटरी क्लब जवळ आगमन झाले. त्यानंतर तेथून बाईक रॅलीने ऋतिकाबेन येथील बस स्थानकाजवळील अक्षय जोशी यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. यावेळी बस स्थानक सर्कल पासून शहरातील अशोक नगर, कित्तूर चन्नम्मा चौक, कोठीवाले कॉर्नरमार्गे मिरवणूक चंद्रप्रभ बावन जिनालय येथे आली. विविध चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर विविध धार्मिक विधी पार पडले. यावेळी समाजाच्या तीनही मंदिरातील मनीभद्रवीर साठी चढाव बोलण्यात आले.
अरविंद गुरुजी यांनी, गेल्या ४० वर्षात प्रथमच येथील जैनधर्मिय व्यक्ती संन्याशी म्हणून दीक्षा धारण करत आहे. ऋतिकाबेन यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीड वर्षे वकिली केली. याचदरम्यान धर्माबद्दलची आस्था वाढत गेल्याने त्यांनी धार्मिक ग्रंथ, जैन धर्माची तत्त्वे जाणून घेतली. यावेळी धर्माबद्दलचे प्रेम अधिकच वाढत गेल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. यासाठी जप, तप, उपवास, ग्रंथ वाचन, तत्वे अंगिकारली असल्याचे सांगितले.
यावेळी मास्क ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश शहा, उपाध्यक्ष सतीश वखारीया, सचिव मिलिंद मेहता, नगराध्यक्षा सोनल कोठडीया, शेफाली मेहता, नगरपालिका आयुक्त महावीर बोरन्नावर, राजेश शहा, राजेंद्र मेहता, सुरज राठोड, महिपाल शहा, राजू मेहता, जवाहर शहा, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिक उमादेवी, वैभव कंगळे, राहुल कोठारी, राजेश कोठडीया, नगरसेवक राजू गुंदेशा, राजेंद्र कंगळे, संदीप माने, रितेश शहा, सुजित स्वामी, सुजल मेहता यांच्यासह डॉ. वैशाली व विलास पारिख महावीर आरोग्य सेवा संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि समाज बांधव उपस्थित होते.