
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह, सहकाररत्न उत्तम पाटील आणि निपाणीतील छत्रपती शिवाजी नगरातील फ्रेंडस सर्कलतर्फे शुक्रवार पासून (ता.११) दिवंगत सहकार रत्न रावसाहेब पाटील यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त अरिहंत चषक- २०२५ दुसऱ्या पर्वातील अखिल भारतीय दिवस रात्र खुल्या फुल्ल स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयएसपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे २ दोन लाख रुपये, १ लाख रुपये व ५० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता सहकाररत्न उत्तम पाटील आणि युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, महात्मा बसेश्वर सौहार्द संस्थेचे अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी, नगरसेवक अरविंद शिंदे, उद्योजक धनंजय मानवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती उद्योजक चंद्रकांत मोरे, नगरसेवक विनायक वडे यांनी दिली. बुधवारी सायंकाळी (ता.९) येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळा मैदानावर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलरसाठी स्मार्टफोन देण्यात येणार आहेत. फायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅच साठी एलईडी टीव्ही, मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रिज याशिवाय प्रत्येक मॅच मधील मॅन ऑफ द मॅच अवार्ड देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत नारायणवाडी, जमखंडी, मिरज, कुडची, बोरगाव निपाणी वेंगुर्ले सह एकूण २८ संघाने सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील बक्षीसासह एकूण १० लाख रुपये खर्चाची ही स्पर्धा होणार आहे. लांब पल्याच्या संघाच्या राहण्यासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नॉक आउट दररोज ६ सामने खेळण्यात येणार आहेत. याशिवाय प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने विविध बक्षिसे दिली जाणार असल्याचेही चंद्रकांत मोरे यांनी सांगितले.
बैठकीस अरविंद पारळे, चेतन पांगिरे, प्रथमेश लोहार, अभिजीत सांडुकडे, रवी लोहार, विनायक कांबळे, रवी देवर, सोनू लोहार, सुमित पवार, ऋषिकेश धुमाळ, महेश कांबळे यांच्यासह छत्रपती शिवाजी नगरातील फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. इच्छुक संघानी बबलू मांगोरे, विजय कांबळे, अभिजीत सांडुगडे, संतोष कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta