
निपाणी (वार्ता) : जैन समाजातर्फै देशात अनेक ठिकाणी नवकार महामंत्राचे आयोजन करण्यात आले होते. वैश्विक शांतता, मानवजातीचे कल्याण, परस्परांतील स्नेहभाव वाढवणे आणि आध्यात्मिक उन्नती साधणे या उद्देशाने हा महामंत्र जप कार्यक्रम सर्वत्र पार पडला. त्यानुसार निपाणीतही व्यंकटेश्वर मंदिरात नवकार महामंत्राचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. जैन समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विविध जातीधर्मातील मान्यवर, नागरिक व महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अरविंद शाह (गुरुजी) यांनी नवकार महामंत्राचा अर्थ सांगून या मंत्राचे महत्त्व विशद केले. संगीतकार प्रीतम ओसवाल व रॉकी ओसवाल यांच्या सुमधुर वाणीने नमोकार महामंत्रास सुरुवात झाली. सकाळी ७ ते ९.३० पर्यंत विविध चालीमध्ये या महामंत्राचा जागर करण्यात आला. यावेळी नटराज अकॅडमीच्यावतीने बालकलाकारांनी भरतनाट्यम सादर केले. त्याला टाळ्यांच्या गजरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार शशिकला जोल्ले, नगराध्यक्षा सोनल कोठडीया, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, जयवंत भाटले, माजी सभापती राजू गुंदेशा, प्रकाश शहा, साहिल शहा, अभियंते बी. बी. बेडकिहाळे, नगरसेवक रवींद्र श्रीखंडे, युवराज पोळ, सचिन शहा, प्रतिक शहा, सागर मेहता, प्रसन्न दोशी, रुपेश शहा, सौरभ शहा, अरुण खोडबोळे, प्रा.डॉ. अच्युत माने, नवीन शहा, साहिल श्रीपन्नावर यांच्यासह मान्यवर, श्रावक, श्राविका उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta